Rain Alert Saam TV News
महाराष्ट्र

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला, आठवडाभर धो-धो बरसणार, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट; IMDचा अंदाज काय सांगतो?

Mansoon Update : आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले ते येत्या ३६ तासात अधिक तीव्र होईल.

Prashant Patil

रत्नागिरी : राज्याला अवकाळी पावसाने तडाखा दिलाय. यंदा मे महिन्यातच पावसाचं आगमन झालंय. तर यंदा मान्सून सुद्धा सक्रिय झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून धडकणार आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस धो धो बरसणार आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत पाऊस धो धो बरसणार आहे. अनेक भागांत मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वादळ तयार होण्याची शक्यता आहे.

किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता

आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले ते येत्या ३६ तासात अधिक तीव्र होईल. त्यामुळे त्याचे रुपांतर शक्ती या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्याची पुढची आगे कूच हे उत्तरेकडे असेल.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबईत गेल्या १० मिनिटांपासून पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून रात्रीच्या वेळी दाखल होत आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील यलो अलर्ट दिला आहे.

रायगडला पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरु असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याच प्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनीही आपली होडी किनाऱ्यावर आणली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT