राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rainfall) झोडपून काढले. राज्यातील पुणे (Pune), सांगली (Sangli), अहमदनगर (Ahmednagar), छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar) या जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान देखील झाले आहे. पुण्यामध्ये तर या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील कन्नड, पिशोर, खुलताबाद, वेरूळ, चित्तेपिंपळगाव, काद्राबाद आणि फुलंब्री परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला.
पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळत आहे. शहरासह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. लोहगाव, भवानी पेठ आणि शहरातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यातील विविध गावात आवकाळी पाऊसाच्या सरी कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावासामुळे दिलासा मिळाला. तर दुसरीकडे उन्हाळी बाजरीचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अचानक दमदार अवकाळी पाऊस पडला. ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह जोरदर अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाल्याने पिंपरी चिंचवडकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडले. वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गारपिटीसह पाऊस पडला. विजेच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. गारपिटीमुळे या परिसरातील आंबा, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. शहरात गेल्या अर्धा तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे नाशिककरांची तारंबळ उडाली. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे काही भागात रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. तर जिल्ह्यात सिन्नर अभोण्यासह अन्य काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.