Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : विदर्भात पावसाची शक्यता, राज्यात ढगाळ वातावरण, थंडी कधी परतणार?

Pune Mumbai Weather Forecast : राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धासह राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात तीन ते चार दिवसानंतर थंडी परतण्याची शक्यता

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Update News in Marathi : ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली. दोन दिवस राज्यात धुके आणि ढगाळ हवामानाचे मळभ कायम राहणार आहे. दोन ते तीन दिवस राज्यात तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. विदर्भात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उर्वरित महाराष्ट्रात वातावरण सामान्य राहण्याची शक्यता आहे.

विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता

आज विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण राहणार आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास पारा घसरण्याची देखील शक्यता आहे. पुढील दोन दिवस अशाच पद्धतीचे वातावरण राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण ?

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या कमाल आणि किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पाच दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात आज पावसाची शक्यता आहे, पण पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात दोन दिवसात थंडी परतण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडी कधी परतणार?

बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात सध्या थंडी नाहीसी झाली आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रात फारशी थंडी नसण्याची शक्यता आहे. रविवारनंतर महाराष्ट्रात हळूहळू थंडी परतण्याची शक्यता आहे. त्यापुढील तीन दिवस म्हणजे १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी येण्याची परतण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या उर्वरित राज्यत थंडीचा चढ उतार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT