Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यात कुठे थंडी, तर कुठे उकाडा..., पुन्हा पावसाचे सावट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Winter Update: पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अनेक राज्यातील तापमानावर परिणाम होणार आहे.

Priya More

राज्यातील तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडी पसरल्यामुळे दिसाला मिळाला. तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी आहे.

अशामध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिमाण इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा १२.२ अंशापर्यंत घसरल्यामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. राज्यातील किमान तापमानामध्ये घट होत आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.

राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यामध्ये गुरूवार आणि शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

SCROLL FOR NEXT