Heavy Rain Alert in Maharashtra 
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

IMD Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Namdeo Kumbhar

IMD red alert for Mumbai and Konkan today : हवामान विभागाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि घाट परिसरात आज पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता असल्याने, आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे आणि प्रवासादरम्यान काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून हवामान विभागाने आज, ४ जुलै रोजी राज्याच्या विविध भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यांवर पावसाचा हाहाकार पाहायला मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोकण आणि घाट परिसरात 'रेड अलर्ट'

हवामान विभागाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 'ऑरेंज' व 'येलो' अलर्ट दुसरीकडे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, गोंदिया आणि कोल्हापूर घाट भागात 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. याशिवाय, मराठवाडा आणि विदर्भातील जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या भागात पावसासोबतच वीज पडण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी.

रेड अलर्ट (Red Alert)

शनिवार - पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट.

रविवार - पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे घाट.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

शनिवार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, कोल्हापूर घाट.

रविवार - रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट.

सोमवार - पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट.

मंगळवार - रायगड, पुणे घाट.

येलो अलर्ट (Yellow Alert - वादळी वारे आणि विजांचा कडकडाट)

शनिवार - जळगाव, छ. संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड.

रविवार - नंदुरबार, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सोमवार - सिंधुदुर्ग, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक घाट, कोल्हापूर घाट.

मंगळवार - पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात चमचमीत खायची इच्छा झाली? बनवा तोंडाला पाणी आणणारी गावरान राजगिरा भाजी; पाहा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: कॉक्रोच जनता पार्टीच्या २ मागण्या सरकारकडून मान्य

CJP Protest: सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

Stop eating onions: जर महिनाभर कांदा खाल्ला नाही तर शरीरात कोणते बदल होतात?

IND vs PAK : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला ठरला, पण एकाच अटीवर भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT