Maharashtra Rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Priya More
  • मुंबईसह महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

  • महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार

  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

  • वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यामध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. परतीचा मान्सून सक्रीय झाला असून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील २४ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण परतीच्या पाऊस चांगला पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT