Maharashtra Winter News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Winter News: राज्यात तापमानाचा पारा घसरला असून गारठा प्रचंड वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमान ५ अंश सेल्सिअसवर आले आहे. आज कुठे कसं हवामान असणआर आहे वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • राज्यात थंडीची लाट काहीशी ओसरली असली तरी गारठा कायम

  • जेऊर, धुळे, निफाड, परभणी येथे किमान तापमानात मोठी घट झाली

  • पुणे, यवतमाळमध्ये दाट धुके आणि थंडीचा कडाका कायम

  • राज्यात सगळीकडेच शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे

राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून घट झाली असून थंडी वाढली आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये गारठा जाणवत आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले असले तरी तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. पण उर्वरीत राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. थंडीची लाट काहिशी ओसरली असली तरी राज्यात गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल. पण गारठा मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारी जेऊर येथे राज्यातील सर्वात नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात ६.२, निफामध्ये ६.६ आणि परभणीत ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचसोबत पुणे आणि अहिल्यानगरमध्ये ९ अंश सेल्सिअस, मालेगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

तर पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार आहे. पुणे शहर आणि परिसरात किमान तापमानात होत असलेली घट कायम आहे. गेल्या आठवड्यापासून किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले. त्यामुळे पुणेकर अक्षरशः गारठून गेले आहेत. पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल होत थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेपासूनच जिल्ह्याच्या अनेक भागात रस्त्यांवर दाट धुके पसरले असून थंडीची तीव्रता वाढल्याने किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. थंडी वाढल्याने शेतकऱ्यांसह मजूरवर्ग, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांवर परिणाम झाला आहे. यवतमाळमध्ये सगळीकडे शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. तर रस्त्यांवर धुक्याची चादर पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

मुंबईत मोठा भाऊ कोण? जागावाटपावरून महायुतीत तणाव? महापालिकेसाठी मित्रपक्षांचा प्लान की आणखी काही....

SCROLL FOR NEXT