Maharashtra Weather Update  Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: थंडी आली रे! अखेर राज्यात थंडीची जोरदार चाहूल; निफाडचा पारा घसरला, तुमच्या भागात काय आहे स्थिती?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अखेर थंडीची चाहूल लागली असून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, धुळे आणि नाशिक परिसरातही किमान तापमानात घट झाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra winter weather update : राज्यात सध्या हवामानात मोठा लपंडाव पाहायला मिळत आहे. एका बाजूला दुपारी कडक ऊन आणि उकाडा कायम असताना, दुसऱ्या बाजूला मात्र आता गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात हवेच्या दाबात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम आता महाराष्ट्रावरही जाणवू लागला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तिथे पारा थेट खाली घसरल्याने सकाळी आणि रात्री चांगलाच गारठा जाणवत आहे. तसेच जळगाव आणि नाशिक परिसरातही किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे.

निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत असून, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा थेट ११.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. नाशिक शहरासह जळगाव आणि धुळे परिसरातही किमान तापमान १२ ते १४ अंशांच्या दरम्यान आले आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत असून नागरिकांना स्वेटर व शाल बाहेर काढावे लागत आहेत

दिवसाचे तापमान महाराष्ट्रातील अनेक शहरातील अजूनही ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने दुपारी चटका जाणवत आहे. तर दुसरीकडे रात्री ११ नंतर किमान तापमानात वेगाने घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो. दिवसा कडक ऊन आणि रात्री गार हवा अशा या दोन प्रकारच्या तीव्र हवामानामुळे संमिश्र ऋतू अनुभवता येत

कसा राहील पुढील काही दिवसांचा अंदाज?

हवामान तज्ज्ञांच्या मते, हवेच्या दाबातील बदलांमुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी-जास्त होत राहील. काही दिवस हवेचे दाब वाढल्यामुळे थंडीची जास्तीची तीव्रता जाणवेल, तर काही दिवस दाब कमी झाल्याने गारठा थोडा मंदावल्यासारखा वाटेल. सध्या राज्यातील बहुतांश भागांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून असल्यामुळे पहाटेच्या वेळी हलका गारवा आणि सुखद वातावरण अनुभवायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : पैसा येण्याचे मार्ग मोकळे! 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

SCROLL FOR NEXT