Maharashtra weather forecast next five days : राज्यात सलग काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसानंतर आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा (२३ जुलै ते २७ जुलै २०२६) जिल्हास्तरीय अंदाज आणि इशारा जारी केला आहे. २७ तारखेपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिलेला नाही.
राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून रेड अलर्ट पूर्णपणे हटवण्यात आला आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शुक्रवारी राज्यातील पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) देण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाट, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागात पावसाचा जोर काहीसा कमी होऊन 'यलो अलर्ट' राहील. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी कुठल्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.
शनिवारी २५ जुलै रोजी पावसाचा जोर आणखी कमी होणार असून या दिवशी राज्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट पूर्णपणे निरंक राहतील. २५ जुलैला केवळ रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांत हवामान विभागाने 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तीव्र तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल.
त्यानंतर २६ जुलै (रविवार) आणि २७ जुलै (सोमवार) रोजी हवामानात अधिक सुधारणा होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या कालावधीत केवळ पुणे घाट परिसरात यलो अलर्ट राहील, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये 'ग्रीन अलर्ट' (Green Alert) राहण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे विकेंडनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.