Jalgaon Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा, राज्यात उन्हाचा पारा वाढणार, आजचा हवामानाचा अंदाज काय?

Marathwada unseasonal rain alert : मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे शहरात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाणार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather today : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. आज मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भाच्या काही भागांत वादळी वारे, विजांसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात ढगाळ, उष्ण व दमट हवामान राहील. कोकण आणि पुणे, सांगली, सोलापूरसारख्या भागातही उष्णता तीव्र राहील, पण काही ठिकाणी संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे थोडासा दिलासा मिळू शकतो.

मराठवाड्यात तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहेत. सायंकाळनंतर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे. सोमवारचे कमाल तापमान: परभणी ४१.६°C, छत्रपती संभाजीनगर ४०.८°C, बीड ४१.०°C, नांदेड ४०.०°C, लातूर-धाराशिव ३९.०°C. दरम्यान, सोमवारी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वाराची (30-40 किमी प्रतितास वेगाने) शक्यता आहे. विदर्भातील नागपूर येथे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वाराची (30-40 किमी प्रतितास वेगाने) शक्यता आहे.

पुण्यात पुन्हा ऊन वाढणार

पुणे शहरात पुढील ६ दिवस तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज पुणे हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान १ ते २ अंश सेल्सिअस डिग्रीने वाढणार आहे. पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उकाडा सहन करावा लागणार आहे.

सोमवारी पुण्यातील विविध ठिकाणचे तापमान अंशसेल्सिअसमध्ये

शिवाजीनगर ३९.२

कोरेगाव पार्क,मगरपट्टा, ३८.९

हडपसर येथे ३८.८

वडगाव शेरी येथे ३८.४

चिंचवड येथे ३८

एनडीए येथे ३७.६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

Tehseen Poonawalla: 'माझ्या घरावर पोलिसांची धाड, मला नजरकैदेत ठेवलं'; E-20 विरोधात उपोषणाआधीच तहसीन पुनावालांचा गंभीर आरोप

Maharashtra News Live: डोवालांच्या टिप्समुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा - अमित शहा

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT