MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES THUNDERSTORM AND RAIN ALERT ACROSS SEVERAL DISTRICTS Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : पुढील ३ दिवस महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Today News : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून IMD ने अनेक जिल्ह्यांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज

  • विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा

  • मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामान कायम राहणार

  • हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले

Maharashtra Today Weather Update राज्यात एकीकडे मे महिन्याच्या कडक उन्हाने नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे काही भागांत हवामानात अचानक बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील विविध भागांत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी (Ratnagiri), रायगड(Raigad), ठाणे, मुंबई (Mumbai) आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. विशेषतः मुंबई आणि उपनगरांत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे.

उद्या शनिवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

काल म्हणजेच गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका महाड आणि पोलादपूर तालुक्याला बसला. महाडमधील खरवली, ढालकाठी, सोलमकोंड भागात वादळामुळे घरांची छपरे उडून नुकसान झाले. झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. पोलादपूर तालुक्यातील परसुळे गावातील गावातील घरांचे देखील या वादळी पावसात नुकसान झालं. विजेचे खांब पडून तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT