Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather: महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही, राज्यातील तापमानात पुन्हा वाढ, तापमान ३६ अंश सेल्सिअसवर

Weather Report: मुंबईत पहाटे गारवा असला तरी दिवसभर तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील एक-दोन दिवस हे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

Dhanshri Shintre

मुंबईत पहाटे किंचित गारवा जाणवत असला तरी दिवसा तापमानाचा चढ-उतार सुरूच आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमानात वाढ झाली असून, पुढील एक-दोन दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, मंगळवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३२.९ अंश सेल्सियस, तर सांताक्रूझ येथे ३५.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. सोमवारीच्या तुलनेत हे तापमान दोन अंशांनी अधिक होते. मुंबईत पहाटे गारवा असला तरी दुपारी उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे.

सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दिवस पुढे जाताच उष्णता जाणवू लागते. तापमान 35 अंशांवर पोहोचले असून, राज्यभरही हवामानात चढ-उतार सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

राज्यात उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे, आणि कमाल तापमान 36 अंशांच्या पुढे पोहोचले आहे. सोमवारी सकाळपर्यंत सोलापूरमध्ये 37.4 अंश तापमानाची नोंद झाली, जी राज्यातील उच्चांक ठरली आहे. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, हरियाणातील रोहतक भागात देशातील सपाट भूभागावर 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर महाराष्ट्रात निफाडमधील गहू संशोधन केंद्रात 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यभरातील किमान तापमान 10 ते 22 अंशांच्या दरम्यान आहे.

रविवारी सकाळपर्यंत सोलापूर, जेऊर, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा यांसारख्या भागात तापमान 36 अंशांच्या आसपास होते. राज्यभर उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या आहेत आणि नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT