maharashtra monsoon saam tv
महाराष्ट्र

Monsoon Alert : कोकण- मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज

Maharashtra News : महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने घाटमाथा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज वर्तवून यलो अलर्ट जारी केला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पावसाचा जोर कमी; काही भागात अधूनमधून सरी.

  • घाटमाथा व मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज, यलो अलर्ट.

  • पावसाची उघडीप वाढल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंता.

  • सप्टेंबरमध्ये पुन्हा मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता.

राज्यात मागील आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंतच्या भागांत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या तुडुंब भरल्या, तर काही ठिकाणी भूस्खलन व पाणी साचल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. मात्र या मुसळधार पावसाच्या मालिकेनंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसतो आहे. राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, हलक्या सरी अधूनमधून कोसळताना दिसत आहेत.

आज हवामान विभागाने घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांसह जोरदार सरींची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित भागांसाठी सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विशेषत: रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा उर्वरित भाग, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण राहील, पण पावसाची उघडीप कायम राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर आटोक्यात आला असला, तरी वातावरणातील आर्द्रता व ढगाळ हवामान यामुळे दुपारी किंवा सायंकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कायम आहे.

शनिवारी, म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात पावसाची उघडीप होती. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, मात्र कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील गोंदिया परिसरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. धुळे येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे पावसाळ्यातील तापमानाच्या तुलनेत जास्त आहे.

सध्या राज्यातील पावसाची परिस्थिती काहीशी थांबलेली असली तरी अचानक होणाऱ्या मुसळधार सरींमुळे नद्या, ओढे-नाले वाहू लागण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT