Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: मान्सूनचा 'जय महाराष्ट्र'! सर्व भागांमधून माघारी परतला; पुढील काही दिवस कसं असेल हवामान?

Maharashtra Rain Update: परतीच्या प्रवासावर असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे आज देशाच्या बऱ्याच भागातून परतले आहेत.

Bharat Jadhav

Maharashtra Weather :

मान्सूनचा पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून राज्यातून मान्सून पूर्णपणे बाहेर पडलाय. यंदा राज्यात कमी राहिला आहे. महाराष्ट्रात उशिरा येणा्ऱ्या मान्सूनने राज्यावर कमी कृपा दाखवली. साधरण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी बसरला. (Latest News)

त्यानंतर जुलै महिन्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात २१ दिवस वरुणराजाने दांडी मारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काहीसा बरा पाऊस झाला परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यामधील सरासरी पावसाची तुट भरुन काढली नाही. यामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.

परतीच्या प्रवासावर असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे आज देशाच्या बऱ्याच भागातून परतले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागातून मान्सून बाहेर पडलाय. परंतु कोकण आणि विदर्भातील काही भागातून अद्याप मान्सून परतलेला नाही. मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण असल्यानं लवकरच संपूर्ण देशातून नैर्ऋत्य मोसमी वारे बाहेर पडतील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय.

परतीचा प्रवास सुरू मान्सूनला विलंब लागला. सप्टेंबरच्या २५ तारखेपासून मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या प्रवासासाठी मान्सून उशिर करत आहे. दरम्यान मान्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख पाहता १० ऑक्टोबरपर्यंत तो राज्याच्या बहुतांश भागातून बाहेर पडत असतो. महाराष्ट्रासह मान्सूनने जम्मू काश्‍मीर, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून निरोप घेतला आहे.

कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहारच्या काही भागातून मान्सून माघारी फिरलाय. महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मान्सून परतणार आहे. सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतलाय. शनिवारपर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनचे नैर्ऋत्य वारे माघार घेतील. राज्यातून मान्सून परतल्यामुळे ऑक्टोंबर हिट जाणवू लागलीय. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढले आहे. दरम्यान राज्यात सध्या कुठेही पावसाची शक्यता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT