Maharashtra Weather IMD Alert saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: राज्यातील 'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा,हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Maharashtra Weather IMD Alert: भारतीय हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसासाठी अंदाज वर्तवलाय. या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह चार राज्यांत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय.

Bharat Jadhav

नेहमीच्या वेळेपेक्षा आठवडाभर आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. पहिल्याच पावसात महाराष्ट्रातील अनेक भागांना मान्सूनने झोपडपून काढलं. भारतीय हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसाचा हवामान अंदाज वर्तवलाय. पुढील ७ दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

भारतीय हवामान विभागानुसार, ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिमेला कमी मध्यम दाबाचा पट्टा तयार झालाय. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे संथ गती सरकत आहे. दरम्यान पुढील ४८ तासात स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या महाराष्ट्रासह 4 राज्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. केरळ, कर्नाटक आणि किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र आणि गोवा राज्यात पुढील 4 ते 7 दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार 27 ते 30 मे या काळात केरळमध्ये, 27 मे रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट माथा आणि पायथा परिसरात, कर्नाटकातील किनारपट्टी, घाटमाथ्यावर, त्याचबरोबर तामिळनाडूनतील घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस होईल.मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वारे वाहतील, असेही हवामान विभागाने म्हटलंय. त्याचबरोबर मराठवाड्यात 27 ते 29 मे या काळात वाऱ्यांचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास इतका वाढेल, असेही हवामान विभागाने म्हटलंय.

 उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार

राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागांचे हवामान तज्ञ एस.डी.सानप यांनी दिलीय. सध्या मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळत आहे. पण त्याची तीव्रता उद्यापासून कमी होणार आहे. हळूहळू राज्यात देखील पावसाचा प्रमाण कमी होणार 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT