Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: मराठवाडा आणि विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट कायम! हवामान विभागाच अंदाज काय सांगतो?

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Update Today Rain Alert

राज्यामध्ये पुढील 24 तासांत काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये आज पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने (Maharashtra Weather Forecast) दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. या परिस्थितीत वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान होत आहे. (Latest Weather Update)

हवामान विभागाने आज ८ एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण (Rain Alert) आहे. उन्हाच्या झळा आणि तीव्र उकाडा जाणवत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा, (Maharashtra Weather) मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी २४ तासांमध्ये सोलापूर आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. (Maharashtra Weather Forecast Update) आज राज्यात तापामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात ८ ते १० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, पालघर, ठाण्यामध्ये तापमानात वाढ होणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Maharashtra Weather Update) आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 9 ते 12 एप्रिल दरम्यान, केरळ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस (Weather) होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT