Maharashtra Today Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Maharashtra weather forecast today IMD : महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Forecast : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे, पण मागील चार दिवसांपासून वाटचाल सध्या काहीशी संथ सुरू आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूम गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सध्या मॉन्सूनची सीमा सुरत, इंदूर आणि मोतिहारी या भागातून जात आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवरही आज पावसाचा जोर पाहायला मिळेल. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज असल्याने येथे 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. याशिवाय, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे, तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT