Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळीची शक्यता; 'आठ' राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Forecast Update Rain Alert

नागपूरात मध्यरात्री अनेक भागात पाऊस झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला आहे. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री विजांचा कडकडाटसह पावसाने (Maharashtra Weather) हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते (Maharashtra Weather Forecast Update) असा, इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले (Weather Update) आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती (Heat Wave) निर्माण झाली आहे.

सोलापूर येथे राज्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानाची ही स्थिती अजून एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहेय. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज विजांच्या गडगडासह वादळी पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान खात्याने वर्तवली आहे.

मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील गारपीट अन् अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. छत्तीसगडमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला (Weather Forecast Update) आहे. पुढील आठवड्यामध्ये १० एप्रिल आणि १३ एप्रिल रोजी पश्चिमी हवामान बदल अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशामध्ये १० ते १३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी पंजाब आणि चंडीगडमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. ९ ते ११ एप्रिलदरम्यान छत्तीसगडमध्ये पावसाचा (Weather) येलो अलर्ट जारी केला आहे.बिहारमध्येही तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT