Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्ण लाटेचा इशारा; विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Rohini Gudaghe

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात मोठा बदल (Maharashtra Weather Forecast Update)पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये कुठे अवकाळी पावसाचे सावट आहे, तर अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. राज्यामध्ये पुढील 24 तासांसाठी काही जिल्ह्यांना अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता (Maharashtra Weather Forecast) वर्तविली आहे.

आज मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये उन्हाचा चटका पुन्हा वाढत (Maharashtra Weather Update) आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कमाल तापमान पुन्हा चाळशी अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामान आहे. उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला (Heat Wave Alert) आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४२.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.

हवामान विभागाने आज कोकण, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात उष्ण रात्रीसाठी येलो अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविली (Unseasonal Rain) आहे. मालेगाव ४२.६, जळगाव ४१.५, अकोला ४१.०, नगर ४०.८, सोलापूर ४०.६, वाशीम ४०.६, नाशिक ४०.४, सातारा ४०.१, पुणे ४०.१ आणि धुळे ४० या जिल्ह्यांमध्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमान होतं.

गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ठाण्यामध्ये संध्याकाळी हलक्या (Maharashtra Weather) पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

वादळीवारा आणि गारपीटने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान (Weather Update) झालंय. या अवकाळी पावसानं शेत पिकांसह घरांचं देखील मोठी प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी वीज पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

Pune Porsche Car Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

साताऱ्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस, आनेवाडीनजीक होर्डिंग काेसळले; वाघोली जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेले

Salapur News: तरुणी तलावाजवळ आली अन् थेट पाण्यात उडी घेतली; सोलापूर शहरातील खळबळजनक घटना

Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हा दाखल होताच आरोपीचे वडील पसार, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT