Weather Updates Saam TV
महाराष्ट्र

Weather Updates : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, येत्या तीन दिवसांत 'या' भागांमध्ये मुसळधार पाऊस!

महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Weather Updates : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशावर मंदोस चक्रीवादळाचं संकट घोघावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात मंदोस चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  (Latest Marathi News)

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, मंदोस चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Weather Updates) होईल. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात १५ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान कोरडे राहिल, याशिवाय राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

आधीच आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रविवारी मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूवर दिसून आला होता. आता या वादळाची दिशा बदलून नैऋत्य झाली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राकडे येणार नाही. तरी सुद्धा राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सकाळपर्यंत मंदोस वादळ आणखी कमजोर होणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

SCROLL FOR NEXT