Maharashtra Mumbai Pune Weather Update: उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिक आणि उत्तर पुण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाहूयात राज्यात आज कसे वातावरण असेल... (Maharashtra weather forecast cloudy skies)
ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश शहराचा पारा १० अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडी गायब झाली आहे. तुरळक ठिकाणी रात्री उशिरा आणि पहाटे पावसाच्या थेंबांनी शिंपण केल्याचे दिसून आले. उत्तर पुणे आणि नाशिकच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा थंडीचा जोर ओसरल्याची स्थिती आहे.
ढगाळ वातावरण, नाशिक-पुण्यातील पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारव्याऐवजी दमटपणा वाढला आहे. यामुळे द्राक्ष बागायतदार आणि रब्बी हंगामातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ढगांमुळे उष्णता साठून राहिल्याने पहाटेची थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. मुंबईतही ढगाळ आकाश मुंबई आणि परिसरातही सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ आहे. पावसाची शक्यता कमी असली तरी हवेतील उकाडा वाढला आहे. ८ जानेवारीनंतरच राज्यात पुन्हा थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अद्याप थंडी कायम आहे. धुळे आणि भंडार्यात थंडीचा कडाका कायम आहे.
पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी
उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर व कळंब परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून काही भागात हलक्या सरी कोसळल्या. पावसाचा जोर कमी असला तरी रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचले. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होणार आहे. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नाशिकमध्येही पावसाच्या हलक्या सरी
नाशिकच्या येवला तालुक्यात परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ,न्याहरखेडा खुर्द देवरे वस्ती परिसरात पावासाने हजेरी लावली. या पावसाचा फटका द्राक्षे, कांद्यासह इतर पिकांना बसणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. काढणीस आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी कांदा हा काढून ठेवलेला असल्याने तो झाकण्यासाठी शेतकर्यांची धावपळ दिसून आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.