maharashtra weather update today temperature hike Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकणार, विदर्भावर अवकाळीचे सावट कायम; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

IMD Alert For Maharashtra: एकीकडे राज्यावर अवकाळीचे संकट तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

Priya More

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून ऊन -पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काही जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण, उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने केला आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. याठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. अकोला राज्यात सर्वाधिक हॉट शहर असून सध्या पारा ४४ अंशाच्या वर गेला आहे. अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होत असल्याने उष्ण लाटेसाठी अनुकूल वातावरण बनत आहे. त्यामुळे उष्णतेचे चटके आणखी बसणार आहे. उष्णतेला अनुकूल वातावरण असल्यामुळे विदर्भात पुन्हा सूर्य आग ओकणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT