Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: नागरिकांनो काळजी घ्या! पुढचे ५ दिवस राज्यात धो-धो, पुणे-नाशिकसाठी पुढचे ३ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Heavy Rainfall In Maharashtra: राज्याला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यासाठी पुढचे ५ ते ६ दिवस महत्वाचे राहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Priya More

Summary -

  • महाराष्ट्रात पुढील ५ ते ६ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • पुणे, नाशिक, अहमदनगरसाठी पुढील ३ तास महत्वाचे असणार आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खानदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

  • शेतकऱ्यांना पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाली आहे. पावसामुळे आलेल्या पूरामुळे अनेक ठिकाणी शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावं पुरामुळे पाण्याखाली गेले आहेत. शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. अशामध्ये हवामान खात्याने राज्यात पुढचे ५ ते ६ दिवस तुफान पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर पुढचे ३ तास पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरसाठी महत्वाचे राहणार आहेत. याठिकाणी तुफान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे ज्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.

सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पाऊस पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.

२७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते. यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम वाढू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

आज पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ तासांत अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT