maharashtra rain alert Saam tv
महाराष्ट्र

उन्हाळ्यात अर्ध्या महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; उद्याच्या हवामानाच्या अंदाजानं टेन्शन वाढलं, कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

maharashtra rain alert : ऐन उन्हाळ्यात अर्ध्या महाराष्ट्राला पावसाने तडाखा दिला आहे. आता उद्याच्या हवामानाच्या अंदाजानं टेन्शन वाढवलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना तडाखा

पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर पावसाच्या सरी सुरू झाल्या. अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील ४ दिवसांसाठी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

अवकाळी पावसाचा इशारा

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात गारपीट आणि अवकाळीचा अंदाज दिला होता. यात नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, कोल्हापूर आणि सांगलीत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

पुणे, सातारा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड,धुळे, बुलढाणा, परभणी, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

उद्या मंगळवारी पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यागर, नाशिक, जळगाव, परभणी आणि हिंगोलीत गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात देण्यात आलाय. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, लातूर आणि ठाणे जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार

पुण्यातील पश्चिम भागात अवकाळी पाऊस झाला. पुण्यातील औंध, बालेवाडी, म्हाळुंगे या भागात पाऊस सुरू आहे. तर जळगावमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसाने केळी पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, अवकाळीने जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT