Heavy Rainfall Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain: कोकणासह विदर्भात तुफान पाऊस, पुढचे काही तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट?

Heavy Rainfall In Maharashtra: राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Priya More

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर चांगला आहे. तर राज्यातील इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर याठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुले या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आज तुफान पावसाचा अंदाज आहे. त्याचसोबत, उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या २४ तासांत नागपूर आणि आसपास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी रात्री पावसाने धुवाधार हजेरी लावली. मात्र गुरुवारी दिवसभर ढग शांत राहिले. गुरुवारी संध्याकाळपासून पावसाची रिपरिप जिल्ह्यात सर्वत्र सुरू झाली. तर, पुणे शहरात गेले दोन महिन्यात ५११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाचा मान्सून पुणे शहरावर मेहरबान झाला आहे. मागील दोन महिन्यात ५११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली शहराची वार्षिक सरासरी ७०० ते ७५० इतकी आहे. मात्र दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या ७० ते ८० टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT