Surabhi Jayashree Jagdish
तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आघाडीवर असाल. कामाच्या ठिकाणी आपला विशेष आदर होईल.
एखादी महत्त्वाचे वार्ता कानावर येईल. धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग असेल. विष्णू उपासना करावी.
कोणाचेही सहकार्याची अपेक्षा न करता कामे करावी लागतील. आपल्या राशीतला असणारा गोडवा जपा.
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. समोरचा काय म्हणतो हे आज समजून घेणे आवश्यक आहे.
काही ना आरोग्याच्या तक्रारी आज जाणवतील. दैनंदिन कामे विनाकारण रखडण्याची दाट शक्यता आहे.
मुला-मुलींचे प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडले असतील तर आज ते मार्गी लागतील.
प्रॉपर्टीचे सौख्य चांगले. रक्षाबंधन असल्यामुळे घरी कुटुंबीयांबरोबर आनंदाने वेळ व्यतीत कराल. कामानिमित्त काही प्रवासही होण्याची शक्यता आहे.
जिद्दीने कामे कराल. बहिणीला विशेष माया प्रेम द्यालच याबरोबर काही विशेष पराक्रमही आज घडतील.
व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय काही असतील तर आज ते मार्गी लागतील.
आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. कुटुंबीयांबरोबर आनंद वाटेल. दिवस चांगला आहे.
महत्त्वाची कामे रखडण्याची आज दाट शक्यता आहे. वाहने सुद्धा जपून चालवावीत असा सल्ला आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये एक वेगळी धामधूम असते. आज प्रियाजनांचा सहवास लाभेल.