Maharashtra Water Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Water Crisis: नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त, जनता हंडाभर पाण्यासाठी त्रस्त; ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई

Nashik News: एकीकडे नेते प्रचारात व्यस्त असताना नागरिक मात्र हंडाभर पाण्यासाठी त्रस्त झाल्याचं चित्र राज्यातील अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

Satish Kengar

Maharashtra Water Crisis:

>> अभिजित सोनवणे

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नेते आपला संपूर्ण जोर लावून निवडणूक प्रचार करत आहे. यातच एकीकडे नेते प्रचारात व्यस्त असताना नागरिक मात्र हंडाभर पाण्यासाठी त्रस्त झाल्याचं चित्र राज्यातील अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ऐन ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यातच धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या ईगतपुरीत भीषण पाणीटंचाई निर्माण जाळ्याची बातमी समोर येत आहे. ईगतपुरी शहराच्या पाणीपुरवठ्यात सरसकट २५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नगरपरिषदेचा सांडवा आटला तर तलावातील पाणीही संपण्याच्या मार्गावर आहे. पर्यायी स्त्रोत असलेल्या भावली धरणात अवघा १२ टक्के तर तळेगाव धरणात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे २५ टक्के पाणीकपातीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा निर्णय घेतला आहे. पावसाचं माहेरघर असलेल्या ईगतपुरी तालुक्यावर एप्रिलमध्येचं पाणीटंचाईचं गडद सावट झाले आहे. तालुक्यातील आदिवासी भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची तळपत्या उन्हात भटकंती होत आहे. डोंगरात झिरपणारे तसेच जमिनीत खड्डे खोदून झिरपणारे पाणी भरण्याची वेळ महिलांवर आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा

- भावली धरण - १२.६२ %

- कडवा धरण - १८.३६ %

- दारणा धरण - २३.९३ %

- मुकणे धरण - २९.१६ %

- भाम धरण - १८.४३ %

धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात ७५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा

धाराशिव जिल्ह्यात तापमानात वाढ होऊ लागली तशी पाण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. तर बाष्पीभवन देखील वाढले असून जिल्ह्यातील २२६ प्रकल्पापैकी ५९ प्रकल्प कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पातही केवळ ४२.५६१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत एकाही प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक पाणी नाही. येत्या काळात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई झळा सहन कराव्या लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT