राजधानी दिल्लीतील YouTube पत्रकार औरंगजेब चौधरी यांना मुंब्रा विधानसभा मतदारसंघात मारहाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती
विधानसभा निवडणुक कव्हर करत असताना केली मारहाण
मुंब्रा पोलीस ठाण्यात मुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल
विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी दिल्लीतून गेलेल्या पत्रकाराला मुंबईत मारहाण झाल्याने खळबळ
हिंगोली शहरात कल्याण मंडपच्या बाजूला आग लागलीये.
चिराग शहा तलावात आणण्यात आलेल्या बोटी जळाल्या.
दिवाळी फोडण्यात आलेले रॉकेट उडून आल्याने आग लागली
आग विझविण्यात पालिकेच्या पथकाला यश
पुण्यासह राज्यात दिवाळी लक्ष्मीपूजनची धूम पाहायला मिळत आहे.
पुण्यात लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी पाहायला मिळत आहे.
पुण्यातील लक्ष्मी रोडसह इतर भागातील व्यापाऱ्यांनी केले लक्ष्मीपूजन
घरोघरी विधिवध पूजानंतर दुकानदारांनी देखील लक्ष्मी मातेची केली पूजा
बीड शहरासह जिल्ह्यात दिवाळीचा जल्लोष साजरा केला जात असताना फटाक्यांची आतिषबाजी होत आहे. मात्र दुसरीकडे या बीडकरांची दिवाळी अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे. आज लक्ष्मीपूजन असताना गेल्या एक तासांपासून बीड शहरातील लाईट गुल झाल्याने बीडकरांचे लक्ष्मीपूजन अंधारात सुरू आहे. यामुळे महावितरण विरोधात बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे.
आज सायंकाळी ६:०४ ते रात्री ८:३५ वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ट्रेडिंग करण्याची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रथा
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
६.०४ मिनिटांनी होणार मुहूर्त ट्रेडिंगला सूरवात
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर एक तास दलाल स्ट्रीटवर चालणार मुहूर्त ट्रेडिंग
अरविंद सावंत यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झालाय. पोलिसांत एफआयर दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ४९८ तक्रारी
पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत आचारसंहिता भंगाच्या एकूण ४९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
त्यापैकी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून १५८ इतक्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या.
त्याशिवाय पर्वती, कसबा पेठ, पुरंदर, शिवाजीनगर या मतदारसंघांतून तक्रारी आल्या आहेत,अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी यशस्वी
बाळासाहेब पुढील २४ तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली दाखल असणार
आंबेडकर कुटुंबीयांनी मानले जनतेचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला सोलापूरच्या दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात जय्यत तयारी
महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी 12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरातील होम मैदानावर होणार जाहीर सभा
सोलापूर जिल्ह्याच्या अकरा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तोफ मुंबईत धडाडणार
९ नोव्हेंबरला अमित शहांची मुंबईत पहिली जाहीर सभा
महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाह मैदानात
अमित शाह उद्धव ठाकरे आणि मविआवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर
गगनबावड्यातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर पोलिसांची छापेमारी
अश्लील हावभाव करणाऱ्या ९ नृत्यांगणांसह ३१ जणांच्या विरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा
३१ जणांमध्ये मुंबई, पुणे, सांगलीसह कोल्हापुरातील व्यक्तींचा समावेश
नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्यात
25 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार, सूत्रांची माहिती
लाडक्या बहिणीकडे आजपर्यंत कोणीच पाहिलेलं नव्हतं, ते या सरकारने पाहिलं.गुलाबराव पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे सह अनेक कार्यकर्त्यांनी केला स्वाभिमानीला रामराम
विधानसभा निवडणुकीत भूमिका घेत असताना राजू शेट्टी यांनी कोणालाच विश्वासात न घेतल्याचा केला गंभीर आरोप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी काढला आपल्या छातीवरचा बिल्ला
राजू शेट्टी ना पाठवला आपल्या पदाचा राजीनामा
राजू शेट्टी हुकुमशहा पद्धतीने संघटनेत काम करत असल्याचा करण्यात आलाय आरोप
शरद पवार राजकारणात आल्यानंतर सन 1970 पासून पवार आपला दिवाळीचा सण सर्व कुटुंबासह एकत्रित साजरा करण्याची परंपरा कायम जपत होते काटेवाडी गावामध्ये सुरुवातीला पाडवा साजरा केला जायचा.. त्यानंतर राबता वाढला आणि हळूहळू शरद पवार हे काटेवाडीतून माळेगावच्या गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी राहायला लागले आणि पुढे येथेच पाडव्याला लोक शुभेच्छा देण्यासाठी येऊ लागले..... याच ठिकाणी कुटुंबातील सर्वजण म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबातील सर्वजण शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी एकत्रित थांबत असत.मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुढे लोकसभेच्या निवडणुक घरातच ननंद विरुद्ध भाऊजय अशी लढाई झाली. यंदा कुटुंबासह नात्यातही दुरावा निर्माण झाला आहे.काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे यंदाच्या पासून स्वतंत्र पाडवा साजरा करणार आहेत. तर शरद पवारांचा पाडवा हा माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानी पूर्वीप्रमाणेच होणार आहे.
आमचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षावर असतात. त्यामुळे आम्ही कामाच्या निमित्ताने जात असतो, भेटतो. पण मी माघार घेणार नाही. मागची अनेक वर्ष मी या भागात आमदार आहे आणि यापुढी ही लोकांची सेवा करणार. बाप्पा मला पावणार, असा विश्वास व्यक्त केलाय शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी.
बेलापूर मधील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निवडणुकीतून माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आलाय. आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने आम्ही निवडणूक लढवत असून मागण्या मान्य झाल्यास जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो मान्य करू अशी प्रतिक्रिया अशोक गावडे यांनी व्यक्त केलेय. त्यामुळे मुख्यमंत्री बंडखोरांची समजूत काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर उद्धव ठाकरेंनी तात्काळ कारवाई करावी - आमदार प्रसाद लाड
मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो.
अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे कारण एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलेली आहे, परंतु त्याच्या विपरीत काम अरविंद सावंत यांनी केले आहे.
दादर माहीम शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर तीन दिवस जाहीर प्रचार करणार नाहीत
सदा सरवणकर केवळ काही बैठक घेणार असल्याची माहिती
काल उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदा सरवणकर यांची झाली बैठक..
बैठकीत सदा सरवणकर यांना विधान परिषदेची ऑफर असल्याची सूत्रांची माहिती
विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ४ तारीख ही शेवटची..
सोमवार पर्यंतचा अवधी असल्यामुळे सदा सरवणकर काय निर्णय घेणार? याकडे प्रत्येकाचे लक्ष
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना
आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सायंकाळी ६ वाजेपर्यंतच उपलब्ध असेल
सायंकाळी ६ ते रात्री १० मेट्रोची सेवा बंद असेल
शनिवार म्हणजे उद्या पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरळीत सुरू असेल
नवऱ्याविरुद्ध बायकोला उभा करण्याचे पाप भाजपने केले असून, भाजपाने घर फोडले. या पाठीमागे रावसाहेब दानवे आहेत. लोक कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतात, इकडे माझी बायको माझ्या विरोधात उभी आहे. धर्मयुद्ध आहे, ठोकून काढूहर्षवर्धन जाधव
आता निवडणुका आहेत आणि त्यामध्ये हा सोहळा होत आहे. यापूर्वी सोहळ्याला कधी विरोध केला का?मात्र आता अशा काळातून प्रचार होतोय. दीपोत्सव किती दिवस होतो आणि दसरा मेळावा एकच दिवस होतो. आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्यावर आक्षेप घेणं चुकीचं नाही.
आमदार आणि नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झालीय. नाशिकमधील ३ जागा भाजपकडे, जिल्ह्यात महायुती म्हणून रणांगणात उतरलो आहोत.गिरीश महाजन, भाजप नेते
आमचे फोन अजूनही त्या बाई किंवा त्यांचे लोक टॅप करून ऐकत आहेत.संजय राऊत, शिवसेना(UBT)
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दिपावली सण साजरा केला जातोय.. मंदिरासह साई समाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर साई समाधीला कोट्यवधींचे सोन्याची आभूषणे परिधान करण्यात आली आहे. सकाळ पासूनच साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. धार्मिक विधींच्या पार्श्वभूमीवर दुपारी साडेचार ते सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सायंकाळची धूप आरती संपल्यानंतर साई समाधीचे दर्शन नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबा देवी मतदार संघात जातीचा राजकारण असले तरी मी सगळ्यांना घेऊन पुढे जाणार आहे
एखाद्या स्त्रीला माल शब्द वापरणं म्हणजे तिचा अपमान करणं जे उभाठा करत आहे
माल बोलल्याने तुम्हीच आता बेहाल होणार आहेत
क्लस्टर डेव्हलपमेंट हा मुद्दा मुंबादेवी मतदारसंघात अतिशय महत्त्वाचा आहे
गेल्या पंधरा वर्षांमध्ये तिथे परिस्थिती बदलली नाही काँग्रेसने काहीच डेव्हलपमेंट केलं नाही
राज ठाकरे यांचे माझे घरगुती संबंध आहेत.. ते सोबत आहेतच
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. गगनबावडा परिसरातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने छापेमारी केलीय. ऐन दिवाळीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत अश्लील हावभाव करून नाचणाऱ्या 9 नृत्यांगनांसह 31 जणांना ताब्यात घेण्यात आलय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या 31 जणांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे सांगली सह कोल्हापुरातील इसमांचा समावेश आहे. गगनबावड्यातील कोदे परिसरात आंबेवाडी येथील नयनिल फार्म रिसॉर्टवर पोलिसांनी छापेमारी केलीय. या कारवाईत 4 लाख 51 हजार 100 रुपये किमतीचा दारू मोबाईल सह इतर साहित्य जप्त करण्यात आलाय. या कारवाईतील 31 जणांच्या विरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज अँजिओप्लास्टी
प्रकाश आंबेडकर यांच्यावर काल झाली अँजिओग्राफी
उजव्या बाजूच्या धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला असल्याची माहिती मेडिकल बुलेटिन मधून देण्यात आली
प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे
अँजिओग्राफीचा अहवाल आज सकाळी १० वाजता येईल
गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा आंबेडकर कुटुंबीयांची विनंती
आज लक्ष्मीपूजन मुहूर्त सोने खरेदीस नागरिक पसंती देतात. यामुळे आज सकाळ पासून सराफ बाजारातील सर्व सराफ दुकानात तोबा गर्दी झाली होती. १५ ते २९ ग्रॅम च्या दागिन्यांना मोठी मागणी होती. अनेक महिलांनी दागिने तसेच सोने चांदीची मूर्ती आणि शिक्का खरेदीसाठी गर्दी केली होती.
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ७ वाजल्यापासून बारामती मतदारसंघातील गुणवडी, मळद तसेच अनेक गावात दिवाळीनिमित्त नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधला...!
शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. माहीमध्ये माघार घेत मनसेला सपोर्ट कारावा, अशी मागणी कऱण्यात येत आहे. पण सरवणकर लढण्यावर ठाम आहेत. काल रात्री जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सदा सरवणकर यांच्यात चर्चा झालीय. सरवनकर आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे.,ते फॉर्म मागे घेणार नाहीत. या बाबत पुन्हा विचार करण्यास मुख्यमंत्री यांचा सल्ला. तर उद्या पुन्हा मुख्यमंत्री सोबत सरवणकर यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील येरवडा परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादातून माजी सैनिकाने एकावर बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अशोक नगर परिसरात एका सोसायटीमध्ये दुचाकीच्या पार्किंग वरून सोसायटीमधील दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये एका माजी सैनिकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.