Abdul Sattar vs BJP Suresh Bankar Who Will Win in Sillod Assembly Constituency Saam TV
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election : सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांचा गेम होणार? सुरेश बनकर यांना अदृश्य शक्तीचं बळ

Satish Daud

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलंय. त्यांनी सलग तीनवेळा येथून आमदारकीची हॅक्ट्रिक केली आहे. आगामी विधानसभेतही आपलाच विजय व्हावा यासाठी सत्तार आतापासूनच तयारीला लागले आहेत.

पण यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी अगदीच सोपी नाही. कारण, उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्याचा डाग सत्तार यांच्या कपाळीच लागलाय. दुसरीकडे मनोज जरांगे फॅक्टरमुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखीच वाढण्याची शक्यता आहे. अशातच सुरेश बनकर यांच्या आमदारकीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सुरेश बनकर यांची जोरदार फिल्डिंग

सुरेश बनकर हे भाजपचे माजी पदाधिकारी पांडुरंग बनकर यांचे पुत्र आहेत. तालुक्यात भाजप वाढीमागे बनकर घराण्याचा मोठा हातभार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सत्तार यांचा पराभव करायचाच असा निर्धारच सुरेश बनकर यांनी केलाय. यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग देखील लावली आहे.

महायुतीत आपल्याला तिकीट मिळालं नाही तरी बनकर हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. यासाठी त्यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अदृश्य शक्तीच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा गेम करणार का? अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विजयाची हॅक्ट्रिक

सत्तार यांनी २००९ मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी अत्यंत कमी मताधिक्यांनी सुरेश बनकर यांचा पराभव केला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. पुढे २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत सत्तार यांचा पराभव होणार असे अनेकांना वाटत होते. पण शेवटच्या क्षणी सत्तार यांनी गेम फिरवल्याने बनकर यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.

पुढे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर २०१९ मध्ये सत्तार यांनी नवा डाव टाकत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे त्यांना तसे करता आला नाही. त्यामुळे सत्तार यांनी काँग्रेसचा पंजा सोडून थेट शिवसेनाचा धनुष्यबाण हातात घेतला. त्यावेळी भाजप आणि एकसंघ शिवसेना यांची युती होती.

त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडे गेला. पण भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला विरोध सुरुच ठेवला. सलग १० वर्ष आम्हाला त्रास देणाऱ्या सत्तार यांना आम्ही युतीधर्म पाळून कुठलीही मदत करणार नाही, असं भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलं. इतकंच नाही, तर त्यांनी सत्तार यांना पराभूत करण्यासाठी नवी रणनिती आखली.

अब्दुल सत्तारांना विजयाचा कॉन्फिडन्स

२०१९ विधानसभा निवडणुकीत सुरेश बनकर यांची मनधरणी करून भाजप पदाधिकाऱ्यांनी एकमताने प्रभाकर पालोदकर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तार यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं. कारण, अपक्ष म्हणून उभे राहिलेले प्रभाकर पालोदकर यांचा मतदारसंघाच चांगला जनसंपर्क होता. आता या निवडणुकीत पालोदकर हेच विजयी होणार, असं अनेकांना वाटत होतं.

पण त्यांच्या सर्वकाही आशेवर पाणी फेरलं गेलं. सत्तार यांनी ऐनवेळी डाव टाकत एक मोठा गट आपल्याकडे खेचून आणला. परिणामी प्रभाकर पालोदकर यांचाही पराभव झाला. अब्दुल सत्तार यांनी मताधिक्यांनी विजय मिळवत आमदारकीची हॅक्ट्रिक केली. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही आपणच विजय मिळवणार, असा कॉन्फिडन्स अब्दुल सत्तार यांना आहे.

सिल्लोड-सोयगावमध्ये जरांगे फॅक्टर चालणार?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करून ते मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सत्तार यांनी तालुक्यात वेगवेगळे कार्यक्रम घेणे सुरु केले आहे. सिल्लोड-सोयगावमध्ये ३ लाख २० हजार हिंदू आणि ६० हजार मुस्लिम मतदान आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात जरांगे फॅक्टर चांगलाच चालला होता.

सत्तार हे सध्या महायुतीत मंत्री असल्याने त्यांच्याविरोधातही 'जरांगे फॅक्टर' काम करू शकतो, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्तार यांच्यासाठी म्हणावी इतकी सोपी नाही. दरम्यान, सुरेश बनकर की अब्दुल सत्तार? सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील मतदार नेमके कोणाच्या झोळीत भरभरून मतं देणार, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT