Rajesh Vitekar, Surekha Thackeray and Sanjay Daund Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: अजित पवारांच्या आमदारांची संख्या वाढणार! विधानपरिषदेवर कोणाची लागणार वर्णी? जाणून घ्या

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या वाटेल दोन जागा येऊ शकतात.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा मिळण्याची शक्यात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन जागांसाठी पक्षात राजेश विटेकर, सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड इच्छुक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीची लोकसभेची जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडताना त्या ठिकाणाहून इच्छुक विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्याचं आश्वसन अजित पवार यांनी आधीच दिलं होतं.

यातच बीड जिल्ह्यातील काम पाहता संजय दौंड यांचा देखील विधान परिषदेसाठी आग्रह आहे. तर सुरेखा ठाकरे यांनी आपण पक्ष संघटनेत सुरुवातीपासून काम करत असल्याने विधान परिषदेची मागणी केली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे, याचे नोटिफिकेशन निघालं आहे. आता या दोन जागांसाठी अजित पवार गटात जवळपास तीन उमेदवार इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. या इच्छुक उमेदवारांमध्ये जी महत्त्वाची नावे आहेत, त्यात राजेश विटेकर, सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड यांचा समावेश आहे. मात्र या तिघांमधील कोणत्या दोन नावावर शिक्कामोर्तब होतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याचं कारण म्हणजे पक्षात जशा प्रकारे एकूण घडामोडी सुरू आहेत, यातच ज्यापद्धीतीने जिल्हापातळीवर काम सुरू आहे, त्या अनुषंगाने या तीन नेत्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. यामुळेच विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Banned: 'या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

Maharashtra Live Update: शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT