Maharashtra Farmer Crisis saam tv
महाराष्ट्र

24 तासांत 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्ज आणि नापिकीचा विळखा

Maharashtra Farmer Crisis Deepens: विदर्भासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या 24 तासांत 5 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. यामागे काय कारणे आहेत ? विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर काय निशाणा साधला आहे ? पाहूयात या रिपोर्टमधून....

Suprim Maskar

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही बळीराजाचा कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीपाचा हंगाम धोक्यात आलाय. राज्यातील बहुतांश भागात बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. अशातच अवघ्या 24 तासांत कर्जबाजारीपणा आणि नापिकीच्या विळख्यात सापडलेल्या विदर्भातील 5 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय...अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन केले तर तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय...

24 तासांत 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आनंदराव खाडे

कामरगाव, वाशिम

विष्णू मेटकर

महागाव, यवतमाळ

नामदेव तायडे

दर्याबाद,अमरावती

गजानन काळमेघ

धामणगाव, अमरावती

दिनेश राऊत

खेडपिंपरी, अमरावती

अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत.

दुसरीकडे गेल्या 6 महिन्यात राज्यातील तब्बल 1 हजार 216 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.

बळीराजाचा कोण घेतंय 'बळी' ?

6 महिन्यांत 1,216 आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर - 463

अमरावती - 411

नागपूर - 167

नाशिक - 138

पुणे - 37

दरम्यान शेतकरी आत्महत्येवरून ठाकरेसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय...मुख्यमंत्री फडणवीसांनी केदारनाथच्या गुहेत जाऊन आत्मचिंतन करावं, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय...

दुसरीकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, या परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करू, असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केलाय... शेतकरी आत्महत्यांचं सत्र पाहता उद्धवस्त झालेल्या कुटुंबांचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भीषण वास्तव समोर आलयं... अपुरा पाऊस, हमीभावाचा अभाव, कापूस आणि सोयाबीनच्या घसरलेल्या किंमती आणि महागाईच्या काळात उसनवार घेतलेले कर्ज फेडण्याचे वाढते मानसिक दडपण यांमुळे शेतकरी हवालदिल झालाय... त्यामुळे फक्त कागदावरच्या योजना किंवा तात्पुरत्या मदतीचं पॅकेज देऊन शेतकरी आत्महत्येचा हा प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर आता मानसिक आधाराचीही गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपघाताचा थरार! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन् ३-४ वाहनांना धडाधड उडवलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील सोनोरी गावात वाघाच्या हल्ल्यामध्ये पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू

...तर भाजपला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही; आमदाराच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Types of Paithani Saree Design: सणासुदीत उठून दिसायचंय? ट्राय करा 'या' ७ खास लेटेस्ट डिझाइन्सची पैठणी साडी

Mumbai Beach : मुंबईजवळचं 'मिनी गोवा'! पावसाळ्यात निसर्ग प्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT