Unseasonal Rain News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरूच; पुढचे 48 तास अतिमहत्वाचे

एकीकडे बळीराजा अवकाळीपासून नेमकी कधी सुटका होईल, याची वाट पाहत असताना दुसरीकडे एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Shivani Tichkule

Maharashtra Rain Today: राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळीसह बऱ्याच जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा देखील बसला असून रब्बी हंगामातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान, एकीकडे बळीराजा अवकाळीपासून नेमकी कधी सुटका होईल, याची वाट पाहत असताना दुसरीकडे एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आज (दि. 30) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

या राज्यांना यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हिंगोलीत अवकाळी पावसाने शेतात साचले पाणी

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. हिंगोली मध्ये तब्बल आडीच तास मुसळधार पाऊस कोसळल्याने भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे हिंगोली तालुक्यातील शेत शिवारात शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या हळद पिकांचं मोठं नुकसान झाल आहे. (Maharashtra Rain)

अमरावती जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा लपंडाव सुरू असताना काल रात्रीपासून अमरावती जिल्ह्यत पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचा शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, अमरावती शहरात अनेक मार्गावर झाडे मूळसकट कोसळल्याने अनेक मार्ग बंद झाले. या पावसाचा (Rain) नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील सहा तालुक्यांना अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे तब्बल सहाशे हेक्टर वरील शेत पिकांचं आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. तर 80 घरांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे

नागपुरात पहाटे पासून पावसाला सुरुवात

शहरातील अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे झाड कोलमडून पडली. पहाटे पासून पाऊस सुरू असल्याने वातावरणात बदल. थंड वाऱ्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी पासून पाऊस सुरु झाल्याने उकाड्यापासून त्रस्त नागरिकांची सकाळ आल्हाददायक झाली आहे.

अवकाळी पावसाने छत्र आणि पोटाचा घास हिरावला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असताना आता शेतकऱ्याच्या डोक्यावर असलेले छत्र देखील या वादळाने हेरावले, चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्याने कापूस साठवून ठवेला. मात्र, जोरदार पाऊस पडला आणि घर तर उडालेच मात्र 2 पैसे वाढून मिळणार या आशेपोटी जमा केलेला वर्षभराचा कापूस देखील वाया गेला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT