Maharashtra political news  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाचा होतोय बिहार; स्थानिक निवडणुकीत रक्तरंजित खेळ, VIDEO

Maharashtra political news : महाराष्ट्राच्या राजकारणात आता अंडरवर्ल्डसारखा थरार सुरू झालाय...हो आम्ही म्हणतोय ते खरंय...कारण पालिका निवडणुकीत घटनाच एवढ्या रक्तरंजित घ़डल्या आहेत....राजकारणी एकमेकांच्या जीवावरच उठले आहेत...नेमके कुठे आणि कुणावर हे जीवघेणे हल्ले झाले त्यावरचा हा रिपोर्ट...

Bharat Mohalkar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राजकीय नेत्यावरचा हा जीवघेणा हल्ला बिहार किंवा उत्तरप्रदेशातील नाही..तर हा हल्ला आहे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरवरील मांदळी गावाजवळचा.. पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राम खाडेंवर 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केलाय..

यात राम खाडे गंभीर जखमी झालेत... मात्र राम खाडेंच्या पत्नीनं भाजप आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय.. देवस्थानाच्या जमीनीच्या घोटाळ्याचं प्रकरण काढल्याने धसांनीच हल्ला घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलाय..तर हे आरोप हास्यास्पद असल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय.

हे फक्त बीडपुरतंच मर्यादित नाही तर श्रीरामपूरमध्येही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय... तर अंबरनाथमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यावर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला केलाय..

बिहारमधल्या राजकीय नेत्यांवरील हल्ल्यासारखे हल्ले आता महाराष्ट्रातही होत आहेत..या राजकीय हल्ल्यांमुळे महाराष्ट्राची वाटचाल बिहारप्रमाणेच जंगलराजच्या दिशेने सुरु झालीय का? असा प्रश्न निर्माण होतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT