Maharashtra Transport Department online transfer process saam tv
महाराष्ट्र

Transfers: परिवहन विभागाच्या १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

Maharashtra Transport Department Transfers: महाराष्ट्र परिवहन विभागाने आयआयटी (IIT) बॉम्बेच्या तांत्रिक सहकार्याने विकसित केलेल्या पूर्णपणे संगणकीकृत प्रणालीद्वारे १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे पारदर्शकता सुनिश्चित झाली आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र परिवहन विभागाने १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या

  • बदली प्रक्रियेत शून्य मानवी हस्तक्षेप ठेवून पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला प्राधान्य

  • प्रशासनातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचं सरनाईक म्हणाले.

परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या शून्य मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आल्या.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराला थारा मिळू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक दिली आहे.

भविष्यात परिवहन विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना; ५७ ई-वाहनांचे लोकार्पण

परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात करण्यात आले. ही ई-वाहने लवकरच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात येणार असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रशासनाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी

कालीका मंदिरात पूजाऱ्याची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

Tuesday Horoscope: संपूर्ण दिवस आनंदात जाणार, 5 राशींच्या व्यक्तींना कामातून होणार लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Schwan Noodles Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी बनवा झणझणीत शेझवान नूडल्स; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT