Saam Tv
महाराष्ट्र

Toranmal Hill Station : खानदेशचे सौंदर्य! तोरणमाळला दाट धुक्याची चादर,निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Nandurbar News : पावसाच्या रिमझिम सरींनंतर तोरणमाळमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. यशवंत तलाव आणि सीताखाई पॉईंट परिसरात निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

Alisha Khedekar

मॉन्सूननंतर तोरणमाळमध्ये दाट धुकं आणि रिमझिम पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे

थंडगार हवेमुळे आणि नयनरम्य दृश्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे

यशवंत तलाव, सीताखाई पॉईंट आणि धबधबा परिसर हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत

ऑक्टोबर हिटला ब्रेक देत गारव्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तोरणमाळकडे आकर्षित होत आहेत

राज्यातून मॉन्सून माघारी गेला असून पावसाला पोषक वातावरण काही ठिकाणी निर्माण झाल्याने तुरळक प्रमाणावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. रिमझिम पावसामुळे येथील निसर्गाची शोभा अधिकच खुलली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर आल्हाददायक आणि नयनरम्य झाला आहे. हे वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरु झाली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या आनंदाजानुसार राज्याला गेले काही दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. सततच्या रिमझिम पावसाने नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून बचाव केला आहे. दरम्यान पाऊस माघारी गेला असून आता नागरिकांना थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सध्या दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून तोरणमाळ परिसरात रिमझिम पाऊस होत असल्यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे आणि सर्वत्र दाट धुके पसरले आहे.

यशवंत तलाव, सीताखाई पॉईंट आणि धबधबा परिसरात धुक्यामुळे दृश्यमानता बरीच कमी झाली आहे. धुक्याच्या या आच्छादनाखाली येथील नैसर्गिक सौंदर्य अधिकच मोहक दिसत आहे. कमी दृश्यमानतेमुळे लांबचे डोंगर आणि दऱ्या स्पष्ट दिसत नसल्या तरी, याच धुक्याचा आणि गारव्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

सलगच्या सुट्ट्या आणि आल्हाददायक हवामानामुळे तोरणमाळ पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबई, धुळे, नाशिक आणि गुजरातमधील सुरत तसेच शेजारील राज्यांतून अनेक पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी दाखल झाले आहेत. थंडगार हवा, धुक्यातील रस्ते आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक खास करून यशवंत तलाव आणि सीताखाई पॉईंट या मुख्य आकर्षणाच्या ठिकाणी गर्दी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

Bigg Boss 19-Pranit More : प्रणित मोरे 'बिग बॉस १९' का जिंकला नाही? 'ही' आहेत कारणे

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

जनावरांच्या गोठ्यात चिमुकलीवर बलात्कार; नंतर नराधमानं धार्मिक स्थळाजवळ आयुष्य संपवलं

Black Spots Onion: काळे डाग अन् बुरशी लागलेला कांदा खावा का? आरोग्यासाठी किती घातक? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT