Maharashtra Political Reaction Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Reaction: तिखट अन् झणझणीत; राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रतिक्रियांमधून समजून घ्या आजचं राजकारण

Maharashtra Political Reaction : दिवसभरातील विविध नेत्यांच्या तिखट राजकीय प्रतिक्रियांमधून आजच्या दिवसाचं राजकारण समजून घेऊयात.

Vishal Gangurde

Maharashtra Political News:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर जनतेला पत्र लिहिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव वगळल्याचं दिसून आलंय.

तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून आता पक्षाच्या बॅनरवर शरद पवार यांच्या जागी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे फोटो वापरण्यास सुरुवात केली आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच दिवसभरातील विविध नेत्यांच्या तिखट राजकीय प्रतिक्रियांमधून आजच्या दिवसाचं राजकारण समजून घेऊयात. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या दाखला देत अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

'मी समजलो की डॉक्टर हेडगेवार फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून आरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, अशा आशयाचं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा दाखला देत अजित पवार गटावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

मंत्री दीपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीकास्त्र

दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. 'राऊत हे सामनामध्ये काहीतरी लिहून नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध बिघडवण्याचं काम करतात. संजय राऊत कोणाशी जास्त एकनिष्ठ आहेत हे आधी ठरवावं. ते शरद पवारांशी जास्त एकनिष्ठ आहेत असं दिसतं, अशा शब्दात केसरकरांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. 'शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही परंपरा कायम राहील. यावर्षी सुद्धा आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.तुम्ही सर्व दसरा मेळाव्याला या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजपने नंदी बैलाला विचारला, पुन्हा एकदा सरकार येईल का? तर मला विश्वास आहे की, शंभर टक्के नंदी बैल हा नाही म्हणेल. खोक्यातून सरकार आणू शकता, पण संस्कार आणू शकत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT