Former education officer arrested in teacher recruitment scam – major action by cyber police saamtv
महाराष्ट्र

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Maharashtra Teacher Recruitment Scam : शालार्थ वेतन प्रणालीमध्ये १२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आणखी एक अटक झालीय. सायबर पोलिसांनी माजी शिक्षण अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Bharat Jadhav

  • शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची अटक

  • शालार्थ वेतन प्रणालीच्या गैरवापरातून 12 कोटींचा भ्रष्टाचार

  • नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अटकेत

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूर जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीने अटक करण्यात आली आहे. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापराच्या संदर्भात एसआयटीच्या सायबर सेलने ही कारवाई केलीय. माजी शिक्षणाधिकाऱ्यावर तब्बल १२ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्यात येत आहे. शालार्थ ऑनलाइन प्रणालीचा बेकायदेशीरपणे वापर करून बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले होते.

बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने या बनावट आयडीद्वारे वेतन आणि देणी काढण्यात आली. शालार्थ आयडीचे प्रस्तावात बनावट कागदपत्र असताना शहानिशा न करता त्याला प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून मंजुरी दिल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. शालार्थ आयडी प्रकरणात मंजुरी देताना शासनाचा सुमारे 12 कोटी रुपयांचा महसूल लाटल्याचा आरोप माजी शिक्षणाधिकाऱ्यावर करण्यात आलाय.

या घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आलीय. यात शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, लिपिक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षकांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक १० मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

SCROLL FOR NEXT