Teacher Recruitment Scam saam tv
महाराष्ट्र

Teacher Recruitment Scam: शिक्षक भरती घोटाळा; सामच्या हाती भरतीचं रेट कार्ड

Teacher Recruitment Scam: साम टीव्हीने बोगस शिक्षक भरती घोटाळा उघड केल्यानंतर त्यात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मात्र हा घोटाळा कसा झाला? शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती किती? आणि या घोटाळ्याचं रेटकार्ड कसं आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

शिक्षक भरती घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलाय. बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक भरतीचं प्रकरण साम टीव्हीने समोर आणलं. आता या घोटाळ्याचे वेगवेगळे पदर समोर येत आहे. हा घोटाळा नागपूर पुरताच मर्यादित राहिला नाही तर या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलीय. या शिक्षक घोटाळ्यातून तब्बल 400 ते 500 कोटींच्या लुटीचा गोरखधंदा सुरु असल्याचं समोर आलंय. या बोगस शिक्षक भरतीचं रेट कार्डच साम टीव्हीच्या हाती लागलंय..

शिक्षक नियुक्तीचं रेट कार्ड

प्राथमिक शिक्षक पदासाठी संस्थाचालकांना 20 ते 25 लाख

तर अधिकाऱ्यांना 5 ते 7 लाख रुपये

माध्यमिक शिक्षकपदासाठी संस्थाचालकांना 20 ते 30 लाख तर अधिकाऱ्यांना 10 ते 12 लाख रुपये द्यावे लागते.

उच्च माध्यमिक शिक्षकपदासाठी संस्थाचालकांना 30 ते 40 लाख तर अधिकाऱ्यांना 15 ते 20 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

सामच्या बातमीनंतर पुण्यातील शिक्षक असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गांजरे यांनी समोर येत या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच मांडलीय. दुसरीकडे नागपूरच्या शिक्षक घोटाळ्याचा आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडचा नवा प्रताप समोर आलाय.. स्वतःला सेफ करण्यासाठी उल्हास नरडने थेट सायबर सेलकडेच तक्रार केली. मात्र हे प्रकरण नरडच्या पुरतं अंगलट आलंय. तर आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आलीय.

तर शिक्षण खातंही खडबडून जागं झालंय. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केलीय.मात्र 580 शिक्षकांच्या बोगस भरतीचं हे प्रकरण फक्त हिमनगाचं टोक आहे.. त्यामुळे शिक्षण खातं खिळखिळ्या करणाऱ्या या प्रकरणाच्या चौकशीनंतर आणखी कोणत्या बड्या धेंडांची नावं उघड होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video Viral: दारूच्या नशेत थेट रेल्वे रूळावर झोपला; समोरून अचानक ट्रेन आली आणि...! मुंबईतील स्टेशनवरील घटनेता Video Viral

HSC Board Exam : कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा! चीट पुरवल्याप्रकरणी २६ शिक्षक निलंबित

New Aadhaar App: आधारची कामे होणार एका क्लिकवर; नवीन अ‍ॅपची फीचर्स कोणते ? वाचा

IND vs PAK : विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पराभूत पाकिस्तानचे खेळाडू हँडशेकसाठी वाट पाहत राहिले? व्हिडिओ पाहा अन् खरं काय ते ठरवा

Maharashtra Live News Update: संयम पाळतोय म्हणून... औलाद समजू नका, अजित पवार विमान अपघाताच्या बाबत रूपाली ठोंबरे आक्रमक

SCROLL FOR NEXT