राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. उसाला प्रतिटन 4500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. मात्र, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सुमारे 61 तासांच्या आंदोलनानंतर कोल्हापूरातील उसदराचा तिढा सुटलाय. गुरूवार रात्री 2 वाजता राजू शेट्टींनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन मागे घेतलंय. राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं प्रस्तावित केलेला उसदाराचा फॉर्म्युला काय आहे ते पाहूयात...
ऊसदराचा फॉर्म्युला काय?
पहिली उचल प्रतिटन 3900 रू. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
गळीत हंगाम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त 100 रू. देणार
साखरेला प्रतिटन 4500 रु. दर मिळाल्यास आणखी 200 रुपये देणार
उसाला एकूण 4200 रुपयांपर्यंतचा दर मिळणार
कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी योग्य अमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेट्टींनी दिलाय... सुरूवातीला शेट्टींच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारखानागदारांना अखेर 3 दिवसांच्या चक्काजाम आंदोलनामुळे सरकार आणि कारखानदारांना माघार घ्यावी लागलीये. शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा झालाय. आणि ऐन दिवाळीत वाहूतककोंडी सुटल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र, निश्चित झालेल्या फॉर्म्युलाची योग्य अंमलबजावणी होणार की पुन्हा शेट्टींना रस्त्यावर उतरावं लागणार याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.