wheels come off MSRTC bus Gangapur Aurangabad Road
wheels come off MSRTC bus Gangapur Aurangabad Road SAAM TV
महाराष्ट्र

ST Bus Accident: धक्कादायक! २५-३० प्रवासी घेऊन निघाली होती बस, अचानक मागचे चाक निखळले अन्...

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नवनीत तापडिया

Maharashtra ST Bus Accident औरंगाबाद: मुंबई-गोवा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसचे चाक निखळून अपघात झाल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली असताना, आता गंगापूर-औरंगाबाद एसटी बसलाही अपघात झाला आहे. गंगापूरहून औरंगाबादकडे येणाऱ्या धावत्या बसचे मागच्या बाजूचे चाक निखळले. या बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) गंगापूर एसटी आगाराची आहे. गंगापूरहून-औरंगाबादकडे (Aurangabad) येणाऱ्या या गंगापूर आगाराच्या धावत्या बसचे चाक अचानक निखळले. रस्ता अत्यंत खराब असल्याने बसचा वेग कमी होता. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बसमध्ये २५ ते ३० प्रवासी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

ही बस गंगापूरवरून लासूर गवळीशिवरा गाजगावमार्गे औरंगाबादकडे येत होती. रस्ता खराब असल्यामुळे एसटी बसचे (ST Bus) मागील बाजूचे चाक आणि रॉड तुटल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

रस्त्यांची दुरवस्था, अपघाताच्या घटना वाढल्या

गंगापूरहून औरंगाबादकडे येणाऱ्या या बसचे मागील चाक निखळले. या घटनेमुळे देखभाल आणि दुरुस्ती विभागाच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. रस्ता अत्यंत खराब असल्याने बसचा वेग कमी होता. यामुळे यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या भागातील रस्ता अत्यंत खराब असल्याने असे अपघात या रस्त्यावर नेहमीच होतात, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दोनच दिवसांपूर्वी निखळले होते बसचे चाक

मुंबई-गोवा महामार्गावरही दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा अपघात झाला होता. एसटी महामंडळाच्या धावत्या शिवशाही बसचे मागचे चाक अचानक निखळून हा अपघात झाला होता. तीन चाकांवर ही शिवशाही बस (MSRTC Bus) काही अंतर धावली आणि थांबली.

अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात मुंबई- गोवा (Goa) महामार्गावरील केंबुर्ली गावाच्या हद्दीत घडला होता.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT