SSC And HSC Exam Saam Tv
महाराष्ट्र

SSC- HSC Result: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली! बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती

Maharashtra HSC Results 2025 Check Date and Time: राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल १३ मे रोजी, तर इयत्ता दहावीचा निकाल १५ ते १६ मे दरम्यान जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Bhagyashree Kamble

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावी आणि दहावीच्या निकालाची तारीख ठरली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. १३ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून, दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ वेबसाईटनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण झाल्या आहेत. आता निकाल छपाई सुरू असून, लवकरच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे, असं बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च तर, दहावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडली. सर्व शिक्षकांनी बोर्डाने दिलेल्या वेळेत उत्तपत्रिकांची तपासणी केली. आता निकाल छपाई सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ११ मे पर्यंत बोर्डाचा निकाल पूर्ण होईल. बारावीचा निकाल १३ किंवा १४ मे रोजी, तर दहावीचा निकाल १६ मे पूर्वी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झालीय. ८ दिवसांत गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल. बारावीचा निकाल १३ किंवा १४ मे तर, दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल. यासंदर्भातील घोषणा शिक्षणमंत्री लवकरच करतील, असं पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT