Maharashtra Board Exam  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Board Exam : दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ! शाळा अन् महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत, पालकांची नाराजी

Maharashtra Board Exam Fee : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने यंदा दहावी आणि बारावी परीक्षेचे शुल्क ५० रुपयांनी वाढविले आहे. ऑनलाइन नावनोंदणीची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली असून, पालकांनी या शुल्कवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Alisha Khedekar

दहावी बारावी परीक्षेचे शुल्क ५० रुपयांनी वाढविले

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर

बारावीच्या उशिरा अर्जासाठी मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत

पालक आणि शिक्षण वर्तुळाकडून शुल्कवाढीवर नाराजी

यावर्षीच्या दहावी आणि दारावीच्या परीक्षांसाठीची नावनोंदणी अर्जाची मुदत आठ दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी संपणार आहे, यंदा माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने परीक्षेचे शुल्क ५० रुपयांनी वाढवलेले आहे. मात्र, सर्वसामान्य विद्यार्थी महागाईमध्ये होरपळलेला असताना है परीक्षा शुल्क गढायला नको होते, अशी प्रतिक्रिया शिक्षण वर्तुळातून उमटलेली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन प्रवेश नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय संस्थांमार्फत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे बंधनकारक असून, अर्ज प्राचार्यांद्वारेच सादर केले जातील.

मागील वर्षी दहावीच्या परीक्षेसाठीचे शुल्क ४२० रुपये होते. यंदा ते ४७० इतके झाले, तर बारावीचे शुल्क ४४० होते. यंदा त्यात ५० रुपयांनी वाढवून ४९० इतके शुल्क केले. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेपर किमतीमध्ये वाढ व इतर अनुषंगिक खर्चामुळे परीक्षा शुल्क वाढविल्याचे स्पष्ट केले. तर पालक शरद गायकवाड़ यांनी महागाईत परीक्षा शुल्क वाढवायला नको होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

परीक्षा मंडळाने म्हटले आहे की, बारावी परीक्षेचा उशिरा अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ७ नोव्हेंबर, तर शाळांनी मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याशा जमा करण्याची मुदत १० नोव्हेंबर असल्याचे परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे. मात्र, यासंदर्भात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माहिती पडताळणी आवश्यक असल्याचंही म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

SCROLL FOR NEXT