Solapur Barshi Abortion Case Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : वंशाला दिवाच हवा म्हणून गर्भपात केला, पण महिलेचा जीव गेला, सोलापूरमधील धक्कादायक घटना

Solapur Barshi Abortion Case News : महाराष्ट्रातील बार्शीत अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर असुरक्षित औषधांनी केलेल्या गर्भपातामुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे.

Alisha Khedekar

  • बार्शीत अवैध गर्भलिंग चाचणीनंतर असुरक्षित गर्भपात

  • अतिरक्तस्रावामुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

  • ३ आरोपींवर गुन्हा दाखल

  • पुढील तपास सुरु

देशभरात गर्भपाताला बंदी असूनही आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये छुप्या पद्धतीने गर्भपात सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. सोलापुरातल्या बार्शीत अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर केलेल्या असुरक्षित गर्भपातामुळे २८ वर्षीय विवाहितेला आपला जीव गमावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर २० व्या दशकात आजही मुलगी असल्याचे समजताच गर्भपात होत आहेत, हे प्रकरण चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत घडला. वृषाली वैभव मोरे (२८ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. ६ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे राहणारा आरोपी विकास पवार याने सोबतच्या एका महिलेच्या आणि पुरुषाच्या मदतीने, वृषाली हिच्या पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी सोनोग्राफी केली.

त्यानंतर गर्भात मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वृषाली हिला गर्भपात घडवून आणण्यासाठी औषध,गोळ्या दिल्या.या बेकायदेशीर आणि असुरक्षित गर्भपातामुळे वृषालीला तीव्र रक्तस्राव सुरू झाला.अतिरक्तस्त्रावमुळे बेशुद्ध झालेल्या वृषालीला बार्शीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मात्र डॉक्टरांनी तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान या प्रकरणी आरोपी विकास पवारसह एक महिला आणि एक अनोळखी पुरुष अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. महिला, मुली आज विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. स्वतः सोबत कुटुंबाचे देखील नाव उंचावत आहेत, मात्र या घटनेनंतर आजही मुलगी नकुशीच कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

ठाकरेंच्या युतीनंतर काल बेफाम नाचले, आज मनसेच्या प्रदेश सरचिटणीसने कमळ घेतलं|VIDEO

Blood Cancer: शरीरावर वारंवार दिसतात ही 2 लक्षणं, असू शकतो जीवघेणा ब्लड कॅन्सर, आताच व्हा सावध, अन्यथा...

नाशिकमध्ये सोलापूर पॅटर्न, 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्याच्या भाजप प्रवेशाला विरोध, कारण काय? VIDEO

Sayali Sanjeev: मुंबई पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शाळेत शिकलीये अभिनेत्री सायली संजीव

SCROLL FOR NEXT