Four former MLAs from Solapur to join BJP in Maharashtra Saam TV marathi News
महाराष्ट्र

Maharashtra politics : भाजपचा राज्याच्या राजकारणात मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार ४८ तासात कमळ घेणार

Maharashtra political news BJP gaining strength in Solapur : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे चार माजी आमदार २९ ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या मास्टरस्ट्रोकने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.

Namdeo Kumbhar

Four former MLAs from Solapur to join BJP in Maharashtra : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी त्याला बळ मिळणार आहे. कारण, सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे ४ माजी आमदार २९ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी मुंबईतील भाजप कार्यालयात सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा अन् कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. सोलापूर जिल्ह्यावर अनेक दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वर्चस्व राहिलेय. पण आता भाजपकडून मास्टरस्ट्रोक मारत त्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम करण्यात आलेय. या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदी राष्ट्रवादी खिळखिळी झाल्याचे दिसतेय. (Ex-MLAs Rajan Patil, Yashwant Mane, and Ranjitsinh Shinde to Enter BJP)

सोलापूरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचा ( Rajan Patil and Yashwant Mane to enter BJP ahead of elections) बुधवारी भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात दुपारी 12 वाजता पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप मानेंच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे प्रवेशाला स्थगिती देण्यात आली, पण भाजप हायकमांडकडून देशमुख अन् कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे समजतेय. दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचा देखील बुधवारीचं भाजपात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिलीप मानेंचाही होणार प्रवेश?

सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत २९ तारखेला पक्षप्रवेश होणार आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने तसेच माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे कमळ हातात घेणार आहेत. सोलापूरमधील माजी आमदार दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश थांबवावा, यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला होता.

भाजपा पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र पक्ष नेतृत्वाकडून स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन अखेर चारही माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. मात्र भाजपने याबाबत तोडगा काढून अखेर माजी आमदार दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor Dies: अवघ्या २५ व्या वर्षी आयुष्य संपवणारा 'हा' मराठमोळा अभिनेता कोण?

Phaltan Doctor Case: PSI बदनेसोबत ६ महिने संपर्क, आत्महत्येपूर्वी बनकरला फोटो अन् मेसेज पाठवले; रुपाली चाकणकरांचा धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update: भर दिवसा सराफ व्यावसायिकाचे लुटमार आणि अपहरणाची धक्कादायक घटना

Unseasonal Rain Damages: अवकाळीचा दुहेरी फटका! कांदा-मका पाण्यात|VIDEO

Guhagar Tourism: विकेंड ट्रीपसाठी परफेक्ट ठिकाण! मुंबईहून फक्त ५ तासांत पोहोचाल सुंदर गुहागरला

SCROLL FOR NEXT