MAHARASHTRA SIR ROW: 2 CRORE VOTERS TO BE EXCLUDED? CONGRESS RAISES QUESTIONS saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

SIR Controversy in Maharashtra: महाराष्ट्रातील SIR मोहिमेवरून राजकीय वाद पेटला आहे. 2 कोटींहून अधिक मतदार वगळले जाण्याची शक्यता असल्याचा दावा करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Rohit Kadam

  • महाराष्ट्रातील SIR मोहिमेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

  • 2 कोटींहून अधिक मतदार वगळले जाण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • विजय वडेट्टीवार यांनी SIR मोहिमेवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात SIR मोहिमेंतर्गत तब्बल 2 कोटींहून अधिक मतदारांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे SIR मोहिमेवरून काँग्रेसही आक्रमक झालीये. काँग्रेसनं SIR मोहिमेवरून गंभीर आरोप केलाय. काँग्रेसनं नेमका काय आरोप केलाय?.SIR मोहिमेला पुन्हा मुदतवाढ मिळणार का?.पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

महाराष्ट्रातही SIR मोहिमेवरून वाद निर्माण झालाय. कारण राज्यातले तब्बल 2 कोटींहून जास्त मतदार य़ा मोहिमेमुळे वगळले जाण्याची चिन्हे आहेत. एकीकडे, SIR मोहीमेला आणखी मुदतवाढ देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सरसावलं असताना काँग्रेसनं मात्र अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यासाठी एसआयआर केलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. याविरोधात राज्यभरात जनआंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. तर दुसरीकडे, SIRच्या माध्यमातून केवळ दुबार मतदारांचीच नावं वगळण्यात असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफांनी केलाय.

राज्यातील विविध जिल्ह्यांत अद्याप मतदारांनी एसआयआर अर्ज भरलेले नाहीत. तरीसुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांत SIR मोहिमेची नेमकी स्थिती काय आहे? पाहूयात.

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार?

जिल्हा फॉर्म जमा नाही

ठाणे 29 लाख

पुणे 29 लाख

मुंबई उपनगर 27 लाख

मुंबई शहर 10 लाख

नागपूर 14 लाख

नाशिक 10 लाख

निवडणूक आयोगानं दिलेली SIR मोहिमेची मुदत संपल्यामुळे लवकरच प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यांत अद्याप SIR अर्ज दाखल न झाल्यानं शिंदेसेनेनंही मुदतवाढीची मागणी केलीये. SIR मोहिमेवरून राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झालीये. काँग्रेसनं केलेल्या गंभीर आरोपांमुळे आगामी काळात राज्यात SIRचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

खरंतर, SIR मोहिमेनंतर देशातील विविध राज्यांत लाखोंच्या संख्येनं मतदार वगळण्यात आलेत. आणि त्याचा परिणाम त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये दिसूनही आलाय. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांच्या नोंदणीसाठी आयोग SIRला मुदतवाढ देणार का? वगळलेल्या मतदारांचा फटका कुणाला बसणार? याबाबत आता चर्चा रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य; मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय, २०२६-२७ पासून सर्व परीक्षांना नियम लागू

snakebite disease : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, सरकारी-खासगी रुग्णालयांना मृत्यूची नोंद बंधनकारक

SCROLL FOR NEXT