Jalgaon Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: महाराष्ट्र हादरला! मित्रासमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ काढून केला व्हायरल; १४ जण अटकेत

Jalgaon Crime: जळगावमध्ये भयंकर घटना घडली. ४० वर्षीय महिलेवर जंगलात सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १५ पैकी १४ आरोपींना अटक केली.

Priya More
  • जळगावमध्ये ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

  • मित्रासमोरच पीडितेवर दोघांनी आळीपाळीने केला बलात्कार

  • आरोपींनी घटनेचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर केला व्हायरल

  • पोलिसांनी १५ पैकी १४ आरोपींना अटक केली

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. ४० वर्षीय महिलेवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केला. जळगावच्या जामनेर तालुक्यात कापूसवाडी गावाजवळील जंगलामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी १५ पैकी १४ आरोपींना अटक केली. एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना २ जून रोजी घडली होती. जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडित महिला देऊळगाव- कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील जंगलामध्ये मित्रासोबत बसली होती. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी या महिलेसोबत भयंकर कृत्य केले. दोघांनी या महिलेच्या मित्रासमोरच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या काही आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ शूट केला होता. या प्रकरणातील एका संशयित आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत एकूण १५ आरोपी आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

या घटनेप्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. भारतीय न्याय संहिता कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ व ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी १४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी टीम रवाना केल्या आहेत. या आरोपीला देखील लवकरात लवकर अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT