बदलापूर नगरपरिषदेत शिंदेसेनेनं वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली.
घराणेशाहीची परंपरा अधिक बळकट होत असल्याच्या आरोपांनी महाराष्ट्रातील राजकारण तापले.
भाजपनं शिंदेसेनेवर कुटुंबराज आणल्याचा आरोप करीत निशाणा साधला.
उमेदवार न मिळाल्यामुळेच अशा उमेदवारी दिल्या जात असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे.
पालिका निवडणुकीत घराणेशाहीनं कळस गाठलाय....सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या कुटुंबात एक-दोन नव्हे तर थेट उमेदवारीचा सिक्सर हाणलाय....कोण आहेत हे नेते आणि कोणत्या पक्षात घराणेशाहीनं उमेदवारीचा विक्रम केलाय त्यावरचा हा रिपोर्ट...
महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वापार चालत आलेली घराणेशाहीची परंपरा आणखीनच जोर धरू लागलीय...राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा एकदा याचं घराणेशाहीची जोरदार चर्चां रंगलीय...त्याला कारण ठरलयं...शिंदेसेनेनं कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत एकाच घरात दिलेले सहा उमेदवार...यामुळे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांचे स्थान फक्त सतरंज्या उचलण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय...
शिंदेसेनेचे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना पक्षानं तिकीट दिलयं... यात वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी वीणा म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे, भावजई उषा म्हात्रे, पुतण्या भावेश म्हात्रे अशा एकाच घरातील 6 जणांना शिंदेसेनेनं उमेदवारी दिलीय...
दरम्यान एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपनं शिंदेसेनेवर घराणेशाहीचा आरोप केलाय....पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे उमेदवारी दिल्याचा दावा शिंदेसेनेच्या वामन म्हात्रेंनी केलाय.
दुसरीकडे भाजपनंही नांदेडच्या लोहा नगरपरिषदेत एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचंही समोर आलं होतं...तसचं महिला आरक्षणामुळे राज्यातील अनेक ठिकाणी सत्ताधारी नेत्यांनी आपल्या कारभारणींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलय...काँग्रेस-राष्ट्रवादीवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेतही यापेक्षा वेगळं चित्र नसल्याचं पालिका निवडणुकीत समोर आलंय. जर उमेदवार मिळत नसल्यामुळे नेते हे करत असतील तर लोकशाहीची ही दयनीय अवस्था म्हणावी लागेल....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.