Maharashtra School Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra School: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शाळांच्या वेळापत्रकात बदल; आता सकाळी ७ ऐवजी...

Maharashtra School Timetable: राज्यातील शाळांच्या वेळाबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळांच्या वेळा बदलण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. पण याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नव्हता. या शैक्षणिक वर्षात हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Priya More

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या, पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. शाळांचे वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आता शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता सुरू होऊ शकतात.

पहिलीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या शैक्षणिक वर्षात बदलला असल्याने शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला जाणार आहे. पहिल्याच्या पाठ्यपुस्तकातील अध्ययन पद्धतीत त्यात झालेले बदल, त्यामुळे अनेक तासिका वाढणार आहे. त्या तासिकाचे नियोजन करणं यासाठी एकूणच शाळांच्या वेळात्रकात बदल केले जाणार असून त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील उच्च स्तरावर अधिकार्‍यानेच दिली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांसाठी मंजूरी मिळालेली आहे, त्याची अंमलबजावणी शाळेच्या पहिल्या दिवसापासून होऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरूवात येत्या १६ जूनपासून होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरतील आणि सायंकाळी ४ वाजता सुटतील असे सांगितले जात आहे. पण याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

दरम्यान, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT