MAHARASHTRA SCHOOLS MAY RUN ONLY 3 DAYS A WEEK AMID FUEL CRISIS saam tv
महाराष्ट्र

Maharashtra School: आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा काय आहे नवा प्रस्ताव

Maharashtra School: महाराष्ट्रात सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या संकटामुळे शालेय बस मालक संघटनेने ३ दिवस प्रत्यक्ष वर्ग आणि २ दिवस ऑनलाइन शिक्षण अशा संकरित (हायब्रीड) शिक्षण पद्धतीचा प्रस्ताव दिला आहे.

Bharat Jadhav

  • इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतोय.

  • आठवड्यातून ३ दिवस शाळा भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

  • २ दिवस ऑनलाईन वर्गांची हायब्रिड सिस्टीम सुचवली आहे.

राज्यामध्ये जाणवणाऱ्या इंधन टंचाईच्या संकटामुळे उद्योग धंदे आणि शेतीची कामांना ब्रेक लागलाय. या इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू असतानाच डिझेल आणि पेट्रोलच्या दरांनी डोकेदुखी वाढवली आहे, याचा थेट परिणाम आता शाळांच्या कामकाजावर होण्याची शक्यता निर्माण झालीय. इंधन टंचाई आणि वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी मुंबईतील स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. (Maharashtra Fuel Crisis Impacts Education Sector)

स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा नवा प्रस्ताव

वाढत्या इंधन दरांचा भार पालकांवर पडू नये आणि बस चालकांचे आर्थिक नुकसान टळवे, यासाठी असोसिएशनने 'दिवसाआड शाळा' भरवण्याचे मॉडेल सुचवले आहे. या प्रस्तावानुसार, आठवड्यातील 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग अशा हायब्रिड सिस्टीमचा अवलंब करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे बसच्या फेऱ्या कमी होतील, इंधनाची बचत होईल आणि परिचालन खर्चही मर्यादित राहील, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

एकच शिफ्टमध्ये शाळा भरवा

सध्या अनेक शाळा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चालतात, त्यामुळे बसला अनेकवेळा ये-जा करावी लागते. यामुळे असोसिएशनने 'सिंगल शिफ्ट ट्रान्सपोर्टेशन' प्रणालीचा प्रस्ताव दिलाय. सर्व शाळांनी मिळून एकच पिकअप आणि एकच ड्रॉप वेळ निश्चित केल्यानं बस फेऱ्यांची संख्या कमी होऊन इंधन टंचाईवर मात करणे सोपे जाईल, असा दावा एसबीओए महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केलाय.

पालकांवर फी वाढीचा भार नसणार

स्कूल बस ऑपरेटर सध्या विमा हप्ते, देखभाल खर्च, परवाने, कर्मचाऱ्यांचे पगार आणि विविध टॅक्समुळे आर्थिक दबावाखाली आहेत. इंधनाचे दर असेच वाढत राहिले, तर बसची फी वाढवण्याचाच पर्याय असेन. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकायची आमची इच्छा नसल्याचं असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

सरकारकडे सवलतीची मागणी

शालेय बस ऑपरेटर दररोज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करतात. कठीण काळात ज्याप्रमाणे विमान सेवा किंवा इतर वाहतूक क्षेत्राला सवलती दिल्या जातात, तशाच प्रकारे स्कूल बस क्षेत्रालाही इंधन सबसिडी किंवा इतर सवलती देऊन सरकारने दिलासा द्यावा, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. विद्यार्थी, शाळा, पालक आणि बस चालक अशा सर्व घटकांसाठी 'विन-विन' ठरेल असा तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पुन्हा फोडली? बंडखोर खासदार वेगळा गट स्थापन करणार?

Purnima Dey: 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम पूर्णिमा डेचा रेड हॉट अवतार; फोटो पाहून चाहते घायाळ

Ashok Kharat : अमावस्येच्या रात्री जोडप्याला बोलवलं अन्...; नाशिकमधील आणखी एका अशोक खरातचा पदार्फाश

पुढे 7 वाहन अन् मागे 7; NEET पेपरसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त|VIDEO

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांनी केली शासनाच्या कर्जमाफी आदेशाची होळी......

SCROLL FOR NEXT