Dada Bhuse announcing major shift in school staff hiring policy during Maharashtra Legislative Council session.  saam tv
महाराष्ट्र

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Maharashtra Schools: राज्यातील शाळांमध्ये शिपाई आणि चतुर्थ श्रेणी पदांची भरती आता कंत्राटी पद्धतीने होणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली असून विरोधकांकडून या निर्णयावर जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी कायमस्वरूपी भरतीएवजी कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. जे कर्मचारी आता सेवेत आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील. पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी भरती केली जाणार आहे अशी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत केली.

शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे. यु-डायस (UDISE) प्राणलीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले.

कंत्राटी पद्धतीला विरोधकांचा आक्षेप

मंत्री दादा भुसे यांनी कंत्राटी पद्धतीने भरतीची घोषणा केल्याने विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची कायमस्वरूपाचीच झाली पाहिजे. अशी मागणी करत विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला. तसेच मंत्री दादा भूसेंकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली. अनेक शाळामध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरुपी भारती झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT